मुंबई

स्वच्छतेसाठी महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

CD

स्वच्छतेसाठी महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
महापालिकेत क्षमता बांधणी कार्यशाळा

नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका येथे स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत कचरामुक्त शहरांच्या उद्देशाने स्वच्छतेविषयी क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यशाळेत २५० हून अधिक महिला स्वच्छता कर्मचारी, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले. हिमालयन इन्स्टिट्युट फॉर एन्व्हायरमेंट, इकोलॉजी अँड डेव्हलपमेंट या नॉलेज पार्टनर संस्थेच्या वतीने ऑरनेट टेक्नॉलॉजिसच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
या वेळी बृहन्मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप व प्रशिक्षक तिक्षला गायकवाड यांनी घनकचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास उपआयुक्त डॉ. अजय गडदे व मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

Baramati News : वीजेच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरु

SCROLL FOR NEXT