मुंबई

तृप्ती पेन्सलवार ‘आयडॉल’ शिक्षक यादीत अव्वल

CD

बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट, परिणामकारक आणि नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या ३३२ ‘आयडॉल’ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील देवळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती पेन्सलवार यांचा या प्रतिष्ठेच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे त्या या यादीत अव्वल ठरल्या असून, ठाणे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम, अध्यापनातील आधुनिक पद्धतींचा प्रभावी वापर आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले पुढाकार यामुळे त्यांचे कार्य राज्य स्तरावर विशेष ठरले आहे. ग्रामीण भागात कार्यरत असूनही त्यांनी शिक्षणात नवे प्रयोग राबवत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्यांच्या ‘आयडॉल’ शिक्षक म्हणून झालेल्या निवडीमुळे केवळ वैयक्तिक यश न ठरता ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तृप्ती पेन्सलवार यांच्या या यशामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक त्यांचे पती व इंदगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांनी केले आहे.

उपक्रमामागील उद्देश
उत्कृष्ट शिक्षकांचे अनुभव इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे हा उपक्रमामागील उद्देश आहे. त्यानुसार ‘आयडॉल’ शिक्षकांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य राज्यभरातील प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये वापरण्यात येणार आहे. राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील चर्चासत्रांमध्ये या शिक्षकांचा मार्गदर्शक म्हणून सहभाग निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे ऑडिओ, व्हिडिओ व लेखी स्वरूपात दस्तऐवजीकरण करून ते राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार असून राज्यभरातील शिक्षकांना त्याचा लाभ होणार आहे.

बदलापूर : देवळोली शाळेत भारताच्या नकाशात तृप्ती पेन्सलवार यांनी परसबाग फुलवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT