मुंबई

उन्हाळी गर्दीसाठी २,०१२ विशेष फेऱ्या

CD

उन्हाळी गर्दीसाठी २,०१२ विशेष फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुण्यासह प्रमुख स्थानकांवरून विशेष सेवा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल दोन हजार १२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध गंतव्य स्थानांसाठी या गाड्या धावणार आहेत. याशिवाय गरजेनुसार आणखी १२० विशेष गाड्या चालवण्याचेही नियोजन करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुंबईहून गोरखपूर, नागपूर, मडगाव, समस्तीपूर, दानापूर, बनारस तसेच बलिया या महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सीएसएमटी- गोरखपूर दैनिक विशेष, सीएसएमटी- नागपूर द्विसाप्ताहिक विशेष आणि दादर- बलिया त्रिसाप्ताहिक विशेष गाड्यांचा समावेश आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसहून समस्तीपूर, बनारस, दानापूर आणि मडगावकडेही विशेष गाड्या धावणार आहेत. पुणे विभागातूनही मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पुणे- कोल्हापूर दैनिक विशेष तसेच पुणे- गोरखपूर, पुणे- दानापूर आणि पुणे- नागपूर या मार्गांवर अतिरिक्त गाड्यांची सोय करण्यात आली आहे. दौंड- कलबुर्गी तसेच हडपसर- हरंगुळ या मार्गांवरही प्रवाशांसाठी विशेष सेवा उपलब्ध होणार आहे.

आरक्षण सुरू
सोलापूर विभागातून सोलापू- दौंड, सोलापूर- कलबुर्गी आणि सोलापूर- अनकपल्ले या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येणार असून, विदर्भातून बडनेरा- नाशिक रोड आणि नागपूर- मडगाव या मार्गांवरही विशेष सेवा देण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण मंगळवार (ता. १७) पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. काही गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच खुले करण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे मिळणार असून ‘रेलवन’ ॲपद्वारेही आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

ग्राफिक्स - मध्य रेल्वे उन्हाळी विशेष गाड्या (२०२६)
मुंबई विभाग फेऱ्यांची संख्या कालावधी
सीएसएमटी - गोरखपूर : ६० (१ एप्रिल - २ मे)
सीएसएमटी - नागपूर : ५२ (१९ एप्रिल - १४ जुलै)
सीएसएमटी - मडगाव : १८ (१६ एप्रिल - ११ जून)
दादर - बलिया : ८० (एप्रिल - १५ जुलै)
दादर - गोरखपूर : १०४ (१६ एप्रिल - १४ जुलै)
एलटीटी - दानापूर : २१२ (१ एप्रिल - १६ जुलै)
एलटीटी - समस्तीपूर : २६ (२१ एप्रिल - १६ जुलै)
एलटीटी - बनारस : २० (१ एप्रिल - २ मे)
एलटीटी - मडगाव : १८ (१७ एप्रिल - १२ जून)
एलटीटी - सोलापूर : २६ (२१ एप्रिल - १५ जुलै)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगडचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला जाणार

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT