एसआयआयएलसी
हाऊसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. १७ : हाऊसकीपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी २१ व २२ मार्चला हाऊसकीपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. यामध्ये हाऊसकीपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हाऊसकीपिंग क्षेत्राची ओळख, वापरली जाणारी साधने व उपकरणांसोबतच सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवादावरही भर देणार आहे. तसेच हाऊसकीपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करीत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. यावर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तूंची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबत मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण २७ व २८ मार्चला आयोजिले आहे.
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २९ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलिटी, गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, निर्यातीचे नियम इत्यादीसंदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.