नेरूळमध्ये अनधिकृत फूड स्टॉलवर कारवाईची मागणी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २ येथील राजीव गांधी पुलाखालील परिसरात अनधिकृत फूड स्टॉलवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यातून संबंधित विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या परिसरात काही विक्रेते सार्वजनिक ठिकाणी गाड्या लावून वडापाव तसेच इतर खाद्यपदार्थ तयार करीत असून, घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर करीत आहेत. हे स्टॉल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या नियमबाह्य प्रकारामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अनधिकृत स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, परिसरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी ऑनलाइन तक्रार करून महापालिकेने तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.