मुंबई

तारापूर एमआयडीसीमध्ये स्फोटांसह आग

CD

तारापूर एमआयडीसीत स्फोटांसह आग
कारखाना खाक; जीवितहानी टळली

बोईसर, ता. १७ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीतील शिव इंडस्ट्रीज या बंद कारखान्यात मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीने आणि झालेल्या आठ ते १५ स्फोटांनी परिसर हादरला. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर जे-१६२ येथे असलेल्या शिव इंडस्ट्रीज या कारखान्यात मंगळवारी सकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीसोबत झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. अलीकडील वायुगळतीच्या घटनांची भीती अद्याप कायम असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कारखाना सध्या बंद (नॉन-ऑपरेशनल) होता. तरीही कारखान्याच्या आवारात लाइट डिझेल ऑइलने भरलेले चार टँकर उभे करण्यात आले होते. यापैकी तीन टँकर आणि एका साठवण टाकीला आग लागली आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. हे टँकर शेजारील भाविका फार्मा कंपनीचे असून, ते तात्पुरते या ठिकाणी उभे करण्यात आले होते.

आगीदरम्यान सलग आठ ते १५ जोरदार स्फोट झाल्याने परिसर दणाणून गेला. दुर्घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे तीन, बीएआरसीचा एक आणि पालघर नगर परिषदेचा एक असे एकूण पाच अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
-----
ज्वलनशील इंधनाचा मोठा साठा
अग्निशमन अधिकारी वैभव तांडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइट डिझेल ऑइलसारख्या अत्यंत ज्वलनशील इंधनाचा मोठा साठा असल्याने आग विझवणे आव्हानात्मक ठरले. या आगीत संपूर्ण कारखाना आणि तीन टँकर खाक झाले असून, मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कामगार वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-----
सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, बोईसर पोलिस, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. बंद असलेल्या कारखान्याच्या आवारात लाइट डिझेल ऑइलचे टँकर का उभे करण्यात आले होते, यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याबाबत आता चौकशी सुरू आहे. तारापूर एमआयडीसीमध्ये वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे.
-----

तारापूर एमआयडीसीमधील दुर्घटनांची मालिका
▪️ भगेरिया इंडस्ट्रीज (२ फेब्रुवारी २०२६) :
ओलियम रसायन गळती
▪️ डीएच ऑर्‍गॅनिक (२६ सप्टेंबर २०२५) :
सल्फाईड वायुगळती; तीन कामगार बाधित
▪️ आरती ड्रग्ज (८ सप्टेंबर २०२५) :
हायड्रोलिक आम्ल हवेत मिसळले; नागरिकांना त्रास
▪️ मेडली फार्मास्युटिकल्स (२१ ऑगस्ट २०२५) :
विषारी वायुगळती; सहा बाधित, चार मृत्यू
▪️ पूर्वी (१७ जुलै २०२४) : ब्रोमीन वायुगळती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगडचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला जाणार

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT