महसूल शिबिरात ५६० आदिवासींना जातीचे दाखले
खारघर येथे विविध योजनांचा लाभ; १४२८ नागरिकांना थेट सेवा
खारघर, ता. १७ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात खारघर येथे आदिवासीबांधवांना मोठ्या प्रमाणावर शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबिरात एकूण ५६० आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, अप्पर आयुक्त वैशाली इंदाणी, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मीनल भोसले-भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. “शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारी” या उपक्रमांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात ठाकूर समाजातील ३४५ तर कातकरी समाजातील २१५ नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले. याशिवाय १६५ आदिवासी रहिवासी दाखले, ९५ इतर रहिवासी दाखले, ८० उत्पन्न दाखले, संजय गांधी योजनेअंतर्गत ७५ लाभार्थी, १४० आयुष्मान भारत कार्ड, ७/१२ चे २८८ उतारे व ८अ चे ४९ उतारे देण्यात आले. एकूण १४२८ नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
या वेळी नगरसेवक प्रवीण पाटील, लीला कातकरी, मीनल पाटील, दमयंती भोईर, मनाली ठाकूर, अनिता पाटील, परेशा पटेल आदी उपस्थित होते. विविध विभागांचे स्टॉल, वैद्यकीय तपासणी, विज्ञान प्रदर्शन व महिला बचतगटांचे उपक्रमही आयोजित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.