काका बॅप्टीस्टा यांची जयंती साजरी
भाईंदर (बातमीदार) : मूळचे उत्तनचे रहिवासी असलेले स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक काका बॅप्टीस्टा यांच्या जयंतीनिमित्त उत्तन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. दर्यामाता चर्चचे धर्मगुरू रेव्ह. फा. बॅरीटन, स्थानिक नगरसेवक शॉन लिओ कोलासो, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मुकुंद यादव यांच्यासह स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी एडवर्ड कोरिया यांनी काका बॅप्टीस्टा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आणि समाजसेवेतील कार्याची माहिती उपस्थितांना दिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासोबत त्यांनी होम रूल लीगमध्ये दिलेल्या नेतृत्वाचाही विशेष उल्लेख या वेळी करण्यात आला. मच्छीमार समाजाचे ज्येष्ठ नेते लिओ कोलासो यांनी काका बॅप्टीस्टा यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करून त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, तसेच पुस्तकांमध्ये नमूद केलेल्या घटनांचा उल्लेख करत काका बॅप्टीस्टा यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कार्याची उजळणी केली. या वेळी काका बॅप्टीस्टा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजात एकता, न्याय व लोकशाही मूल्ये दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.