मुंबई

महापौर बंगला होणार चकाचक

CD

महापौर बंगला होणार चकाचक
महापालिका पुन्हा निविदा मागवणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः महापौरपदाची जबाबदारी स्वीकारून महिना उलटला तरी रितू तावडे यांनी अद्याप भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील महापौर बंगल्यावर प्रवेश केलेला नाही. महापौर बंगल्याची नव्याने दुरुस्ती करणे, बंगल्यातील अंतर्गत सजावट यासाठी तावडे यांचा बंगल्यावरील प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महापौर बंगल्याची डागडुजी व दुरुस्तीसाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली होती. काही लाकडी फर्निचरचीही दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले. या कामासाठी निविदा काढून कामे पूर्ण करण्यात आली. महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य भायखळ्यातील महापौर बंगल्यात होणार होते; मात्र बंगल्याची पाहणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याची डागडुजी न झाल्याने अंतर्गत सजावटीत काही बदल करण्याच्या सूचना तावडे यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार अंतर्गत सजावटीत पुन्हा बदल करतानाच नवीन फर्निचरही घेण्यात येणार आहे. या कामासाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. ही निविदा अंतिम टप्प्यात आहे. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीतही मंजुरीसाठी येणार असून, मंजुरी मिळताच महापौर बंगल्याच्या अंतर्गत सजावटीसाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.
...
चार वर्षे रिकामा
मुंबई महापालिका विसर्जित झाल्यानंतर तब्बल चार वर्षे बंगल्यामध्ये कोणाचेच वास्तव्य नव्हते. त्यामुळे बंगल्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून, फर्निचरही जुने झाले आहे. त्यामुळे बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT