एसी लोकलचा थांबा ओलांडला
भांडुप स्थानकातील घटना; मध्य रेल्वेकडून चौकशी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात एसी लोकलने निश्चित थांबा ओलांडल्याची घटना मंगळवारी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.५६ वाजता सुटलेली कल्याण जलद एसी लोकल भांडुप येथे थांबत असताना दोन डबे पुढे गेल्यानंतर थांबली. या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर स्थानकानंतर भांडुप हा या लोकलचा पुढील थांबा होता. मात्र स्थानकात प्रवेश करताना गाडीचा वेग तुलनेने अधिक असल्याने मोटरमनला उशिरा थांबा लक्षात आला. तत्काळ ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन डबे फलाटाच्या पुढे गेले होते. या घटनेनंतर पुढे गेलेल्या डब्यांतील प्रवाशांना मागील डब्यांतून फलाटावर उतरावे लागले. सुदैवाने त्या वेळी गर्दी कमी असल्याने कोणतीही दुखापत किंवा अपघाताची नोंद झालेली नाही. दरम्यान, काही प्रवाशांनी या घटनेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.