‘बालरंगकर्मी’तून ठाण्यातील विद्यार्थ्यांना रंगमंचाची संधी
लघुपटाचे अनावरण ः ‘एका बटरची बेटर गोष्ट’ सादर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ‘बालरंगकर्मी’ योजनेअंतर्गत तयार केलेल्या ‘एका बटरची बेटर गोष्ट’ या लघुपटाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते या लघुपटाचे अनावरण झाले. या वेळी महापौरांनी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणारी ‘बालरंगकर्मी’ योजना ही महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असल्याचे सांगत बालकलाकारांचे विशेष कौतुक केले.
ठाणे पालिका व साहिल आर्ट मोशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळांतील पाचवी ते नववीतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अभिनय, नाट्य, कॅमेरा हाताळणी, संवाद कौशल्य आणि चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी निवडक विद्यार्थ्यांना संधी देत ‘एका बटरची बेटर गोष्ट’ हा लघुपट साकारण्यात आला आहे. मान्यवरांच्या आठवणी आणि प्रेरणा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी लघुपटातील कथा स्वतःच्या बालपणाशी मिळती-जुळती असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी कोणतेही काम लहान नसते; प्रामाणिकपणे केलेले कामच मोठे ठरते, असा संदेश दिला.
चौथ्या वर्षात लघुपट निर्मिती
‘बालरंगकर्मी’ योजनेचे हे चौथे वर्ष असून, यावर्षी लघुपट निर्मितीचा टप्पा गाठण्यात आला आहे. साहिल आर्ट मोशनचे मंगेश देसाई यांनी या उपक्रमाची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नगरसेवक, अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.