अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी सात जणांवर गुन्हा
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, यामध्ये एकूण सात जणांविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. एक चार वर्षांची चिमुरडी आपल्या १३ वर्षीय बहिणीसोबत क्लासवरून घरी परतत असताना एका नराधमाने तिचा विनयभंग केला. आरोपीने पीडितेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिली. पीडितेने घरी माहिती दिल्यानंतर, तिच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपी आणि त्याच्या पाच साथीदारांनी मिळून वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये आमिर, सलीम, सुलतान, मोहम्मद उमेर, साकीब मुस्तफा अन्सारी आणि साकीबचा भाऊ अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. येथे मोहम्मद मोमिन मो. मुस्ताक अली अन्सारी (२८) याने एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.