भोपोली ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’
ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपक्रम
पालघर, ता. १८ (बातमीदार) ः केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी भोपोली ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेमार्फत उपक्रम करण्यात आला.
विक्रमगड तालुक्यातील भोपोली ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाऊन प्रत्येक घराला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शाळा, अंगणवाडी, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांनाही योजनेद्वारे नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत गावात जलदिंडी, ग्रामसभा तसेच विविध जनजागृती उपक्रम केले जाणार आहेत. तसेच योजनेच्या विविध घटकांचे पूजन, पाण्याची गुणवत्ता तपासणी, योजनेची तांत्रिक माहिती तसेच भविष्यातील देखभाल व संचालनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.