मुंबई

महिलांचे सशक्तीकरण होणे अत्यावश्यक

CD

भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : समाजाचे व देशाचे सशक्तिकरण साध्य करायचे असेल, तर सर्व क्षेत्रातील महिलांचे सशक्तीकरण होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी केले. महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कामतघर येथील वऱ्हाळदेवी माता मंगलभवन येथे शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. आयुक्त अनमोल सागर यांनी, महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. महिलांचे घरगुती तसेच व्यावसायिक व सार्वजनिक जीवनातील योगदान मोलाचे असून त्या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालिका कर्मचारी, आशासेविका व शालेय विद्यार्थिनींनी सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमादरम्यान बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांनी केले. समाजकल्याण विभागाचे प्रमुख मिलिंद पळसुले व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. मेळाव्याला महिला कर्मचारी, आशासेविका व बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
उपमहापौर तारिक अब्दुल बारी मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, अतिरिक्त आयुक्त (समाजकल्याण) नयना ससाणे, उपायुक्त सपना वसावा, उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, शिक्षण विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, शहर अभियंता जमील पटेल, सहाय्यक संचालक (नगररचना) अजय साबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे, नितीन पाटील तसेच प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांनी आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. घरातील महिला निरोगी असेल, तर संपूर्ण कुटुंबाची काळजी उत्तम प्रकारे घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT