मुंबई

श्रमदानातून ग्रामविकासाचा नारा

CD

श्रमदानातून ग्रामविकासाचा नारा
कोळगावमधील शिबिरात ७५ स्वयंसेवक सहभागी

वाणगाव, ता. १८ (बातमीदार) : पद्मश्री जिव्या सोमा मशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव (आदिवासी) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिर कोळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात ७५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
कोळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील यांच्या हस्ते निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य सचिन परशुराम संखे उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी जितेंद्र पवार तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच किरण संखे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघरचे अनंत भंगाळे, रोशन संखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रशांत बोकंद, अतिश बारी, प्रशांत पिंपळे, वैभव भोईर, सोमा बेंडकोळी, एस. जी. घरत, रोहित राऊत, सिद्धार्थ विंदे, एस. बी. खताळ, टी. पी. चौधरी उपस्थित होते. या वेळी सरपंच कुणाल पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी दहा हजारांची, तर योगेश पाटील यांनी पाच हजारांची आर्थिक मदत जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Chain Snatching : नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस! २४ तासांत पाच महिलांना लुटले; ६ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT