मुंबई

डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गाची चर्चा

CD

डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गाची चर्चा
पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा पर्याय
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार)ः डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, डोंगरदऱ्यांतून हा मार्ग जात असल्याने खर्चाचा मोठा बोजा अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे.
डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गाचे १९७७-७८ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. डोंगर-दऱ्यांऐवजी सपाट भूभागातून हा मार्ग जात असल्याने तुलनेने कमी खर्चिक ठरू शकतो. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, भिवंडी, मुरबाड, डहाणू रोड तालुक्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. तसेच वाडा, कुडूस, आंबाडी, भिवंडी, कल्याण, मुरबाड येथील औद्योगिक पट्ट्यांना स्वस्त मालवाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे बोईसर तसेच पालघर औद्योगिक क्षेत्रात तयार माल, कच्चा माल कमी वेळेत पोहोचवणे सोप्पे होणार आहे.
-----------------------
मुंबईवरील ताण कमी होणार
- मुंबई महानगरावर वाढत्या नागरीकरणाचा ताण आहे. विक्रमगड, वाडा, जव्हार परिसरात मोकळी जमीन उपलब्ध असल्याने नागरी विस्तारासाठी हे भाग महत्त्वाचे ठरू शकतात. नवी मुंबई, ठाण्याप्रमाणे भविष्यात डहाणू, विक्रमगड, वाडा, जव्हार भाग मुंबई महानगर क्षेत्राचा विस्तार होऊ शकतो.
- डहाणू रोड स्थानक बाहेरील गाड्यांसाठी टर्मिनस म्हणून विकसित केल्यास उपनगरी रेल्वेसेवा अधिक सुरळीत होऊ शकते. भविष्यात डहाणू रोड-विक्रमगड-कल्याण मार्गे उपनगरी रेल्वेसेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
----------------------
वाढवण बंदरासाठी महत्त्वपूर्ण
वाढवण बंदर प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. बंदर सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढणार आहे. अशावेळी डहाणू रोड कल्याण रेल्वेमार्ग दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. सध्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना कल्याण किंवा ठाणे येथे जाण्यासाठी मुंबईमार्गे वळसा घालावा लागतो. हा नवीन मार्ग झाल्यास नागरिकांना थेट संपर्क उपलब्ध होऊन वेळ व खर्चाची मोठी बचत होईल.
---------------------------
डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गामुळे आदिवासी पट्ट्यांचा वेगाने विकास होईल. उपनगरी रेल्वेवरील ताण कमी होऊन नव्या विकास केंद्रांची निर्मिती होईल.
- प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते
------------------------
डहाणू रोड-नाशिक रेल्वेमार्गाप्रमाणे हा मार्ग महत्त्वाचा ठरेल. आदिवासी भागातील युवकांना रोजगारासाठी कल्याण, ठाणे, मुंबई जाणे सोपे होईल.
-सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते, डहाणू रोड-कल्याण रेल्वेमार्गाची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT