मुंबई

२४ तासांत तिघे जेरबंद

CD

२४ तासांत तिघे जेरबंद
घरफोडीच्या घटनांचा कासा पोलिसांकडून उलगडा
कासा, ता. १८ (बातमीदार)ः कासा परिसरातील दोन घरफोडीतील आरोपींना २४ तासांत जेरबंद करण्यात कासा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील पाच लाख ७४ हजारांचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कासा येथील पाटीलपाडा परिसरात अमोल भोये यांच्या बंद घरातून मंगळसूत्र, सोन्याची चैन, कानातील झुमके, सोन्याचे मणी असा दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला होता, तर कासा गायकवाडपाडा येथील अपर्णा गुप्ता यांच्या घरातील सोन्याचे दागिने, चांदीचा कमरपट्टा, पायातील पैंजण असा तीन लाख दोन हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरण्यात करण्यात आला. दोन्ही घटनांची कासा पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वेळी पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील सुरत येथून राजेश मालवी (२९), दिलखुश बंजारा (वय २३), अंकित गोदावजला (वय २५) अटक केली आहे.
------------------------------------
धाडसाचे कौतुक
गेल्या काही दिवसांपासून परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला होता. फेरीवाले, अनोळखी व्यक्तींमार्फत चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, २४ तासांत आरोपींना अटक झाल्याने कासा पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT