मुंबई

दिव्यांग पुनर्वसन केंद्रात भरती व नुतनीकरणाची मागणी

CD

दिव्यांग पुनर्वसन केंद्रात भरती व नूतनीकरणाची मागणी
राजन नाईक यांचे दिव्यांग कल्याण सचिव यांना निवेदन

विरार, ता. १८ (बातमीदार) : विरार येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात रिक्त कर्मचाऱ्यांची भरती आणि धोकादायक इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर विरार येथील श्री ट्रस्टच्या मतिमंद व कर्णबधिर शाळेसाठी प्रलंबित वेतनेतर अनुदान देण्याचीही मागणी केली आहे. या मागणीबाबत सचिव तुकाराम मुंढे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन महिनाभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील दिव्यांगाच्या प्रबोधनासाठी पालघर जिल्ह्यातील विरार येथे अनेक वर्षांपासून अस्तित्वातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या केंद्रात दिव्यांगासाठी साहित्य तयार केले जात असून, यापूर्वी १५ कर्मचारी कार्यरत होते. मात्र, सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत असून, दिव्यांग पुनर्वसन केंद्राची इमारतही जुनी झाली आहे. धोकादायक श्रेणीतील या इमारतीच्या दुरुस्तीबरोबरच नूतनीकरणाची आवश्यकता आहे, याकडे आमदार राजन नाईक यांनी लक्ष वेधले आहे. दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुलभतेने सुरू राहण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी. तसेच केंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली आहे. प्रलंबित अनुदानाची मागणी विरार येथील श्री ट्रस्ट संचालित स्वामी परिज्ञानाश्रम शैक्षणिक व व्यावसायिक केंद्रामध्ये मतिमंद व कर्णबधिरांना शिक्षण दिले जाते. या शाळेचे २०१४ पासून २०२५ पर्यंत वेतनेतर अनुदान थकीत आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाच मंजूर शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. या शाळेत १०० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी थकीत वेतन व वेतनेतर अनुदान जमा करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली आहे. या प्रश्नांबाबत सचिव तुकाराम मुंढे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच त्याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती भाजप जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT