मुंबई

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत शिपुरकर शाळेचे सुयश

CD

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत शिपूरकर शाळेचे सुयश
माणगाव, ता. १८ (वार्ताहर)ः सुधाकर नारायण शिपूरकर प्री-प्रायमरी अँड प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेला हा सन्मान संपूर्ण माणगावसाठी गौरवाची बाब ठरली आहे.
इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत चौथीतील विद्यार्थी युक्ती धनंजय जगताप हिने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, तिला एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. दुसरीतील अर्जुन पवार याने हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यात अव्वल किताब मिळवला असून, त्याला ७०० रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
पहिलीतील निरव काळे याला पिंक उत्कृष्ट कामगिरीबद्दल, दुसरीतील इरा अतुल फडतरे हिला उल्लेखनीय यशाबद्दल एक्सेलंस मेडल अवॉर्ड प्राप्त झाले. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत सुधागर गावडा याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक्सेलंस मेडल अवॉर्ड मिळाले. सामान्य ज्ञान ऑलिम्पियाड परीक्षा श्रावणी चव्हाण हिने उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक्सेलंस मेडल अवॉर्ड प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT