मुंबई

गॅस टंचाईमुळे कासा परिसरात हॉटेल व छोटे व्यावसायिक अडचणीत

CD

गॅसटंचाईमुळे हॉटेल व छोटे व्यावसायिक अडचणीत
घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांची धावाधाव; पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅसटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांसह छोटे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून, हॉटेलचालक व टपरीधारकांचे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
डहाणू येथील गॅस एजन्सीद्वारे कासा, गंजाड, सायवन व चारोटी परिसरात गॅसपुरवठा केला जातो. मात्र, सध्या गॅस बुकिंग केल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पुरवठ्यासाठी येणारा टेम्पो गंजाडपर्यंत पोहोचताच अनेक नागरिक तेथेच जमा होऊन गॅस मिळवण्याचा प्रयत्न करतात. परिणामी पुढील गावांपर्यंत पुरवठा पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
या अव्यवस्थित वितरणामुळे काही भागातील नागरिकांना गॅस मिळत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. नागरिकांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून अन्यथा भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घरगुती गॅसटंचाईचा सर्वाधिक फटका लहान व्यावसायिकांना बसत आहे. हॉटेलचालक, वडापाव विक्रेते, चायनीज सेंटर चालक यांचे व्यवसाय अक्षरशः ठप्प झाले आहेत. अनेकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन किंवा लाकडावर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर सुरू करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या साधनांच्या किमती वाढल्याने व उपलब्धता कमी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. एका चायनीज विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. रोजच्या उत्पन्नावरच आमचा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकूणच, गॅसटंचाईमुळे सामान्य नागरिकांसह हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले असून, प्रशासन व गॅसपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal BJP Victory : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, डोनाल्ड ट्रम्पही झाले प्रभावित; पंतप्रधान मोदींचे केले खास अभिनंदन

Pune News : खाशाबा चित्रपटाच्या स्थगितीबाबत नागराज मंजूळेंसह जिओला नोटीस

Mangalwedha News : हुलजंती चेक पोस्टवरून नागरिकांचा रस्ता रोको; वाहनांच्या लागल्या रांगा

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: हिटविकेट अन् झेलही! Nitish Rana ची विकेट पाहून सारे चक्रावले... चर्चा रंगली, पण सत्य काही वेगळेच...Video

SCROLL FOR NEXT