मुंबई

मुलुंडमध्ये पोलिसांचा मालमत्ता परतावा उपक्रम

CD

मुलुंडमध्ये पोलिसांचा मालमत्ता परतावा उपक्रम
१.९२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांच्या हाती; १,०८७ मोबाईलसह मौल्यवान वस्तू परत
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : मुलुंडमध्ये मुंबई पोलिसांच्या परिमंडळ साततर्फे भव्य मालमत्ता परतावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलुंड पश्चिमेतील एन.एस. रोडवरील क्राउन हॉल येथे शनिवारी (ता. १४) हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमांतर्गत चोरीला गेलेला तसेच हरवलेला मौल्यवान ऐवज शोधून तो संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी हजारो मोबाईलसह विविध मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या असून, त्यापैकी सुमारे एक कोटी ९२ लाख रुपयांचा ऐवज नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाला अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते तसेच परिमंडळ सातमधील विविध पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या हस्ते हा मुद्देमाल नागरिकांना देण्यात आला. पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ व्हावा आणि गुन्ह्यांमधील जप्त ऐवज लवकरात लवकर मालकांपर्यंत पोहोचवावा, हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. परिमंडळ सात अंतर्गत येणाऱ्या आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांमधील चोरीचा तसेच हरवलेला ऐवज तपासादरम्यान पोलिसांनी हस्तगत केला होता. यामध्ये १,०८७ मोबाईल फोन, सुमारे २३ तोळे सोने, दोन किलो चांदी, दुचाकी वाहने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे एक कोटी ९१ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे. तपास पथकांनी आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून मोबाईल शोधून काढले आणि गुन्हेगारांचा माग काढत चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT