मुंबई

ओसवाल शाळेसमोर नव्या सिमेंट रस्त्याचे खोदकाम

CD

ओसवाल शाळेसमोर नव्या सिमेंट रस्त्याचे खोदकाम
सरावली ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

सरावली, ता. १८ (वार्ताहर) : सरावली ग्रामपंचायतीमार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे ओसवाल परिसरातील ओसवाल शाळेसमोरच खोदकाम करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी नव्याने तयार रस्ता उकरण्यात आल्याने सार्वजनिक निधीचा उघड अपव्यय झाल्याची टीका नागरिकांच्या वतीने होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पाइपलाइनचे नियोजन रस्ता बांधण्यापूर्वीच करणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाअभावी आधी रस्ता तयार करून नंतर तोच पुन्हा खोदला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकारामुळे नव्या रस्त्याची गुणवत्ता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून, शाळेसमोरील परिसरात नागरिक व विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, सरावली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, संबंधितांवर चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Jalgaon Water Crisis : जळगावकरांवर जलसंकटाची टांगती तलवार! १४ कोटींच्या थकबाकीमुळे २७ मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

SCROLL FOR NEXT