पिंगळसई संघाने उमटविली कुणबी चषकावर आपली मोहर
रोहा, ता. १८ (बातमीदार) ः रोहा तालुक्यात प्रथमच घेण्यात आलेल्या कुणबी चषकाचा बहुमान गणेश क्रिकेट क्लब पिंगळसई अ संघाने पटकावला आहे. ही कुणबी चषक स्पर्धा रोहा तालुका कुणबी समाजोन्नती सोनगाव ग्रुप यांच्या वतीने व शिव छत्रपती क्रिकेट असोसिएशन पिंगळसई यांच्या सहयोगाने घेण्यात आली होती.
या स्पर्धेतील उपविजेतेपदाचा बहुमान जय भवानी मुठवली या संघाला मिळाला आहे, तर तृतीय व चतुर्थ अनुक्रमे गणेश क्रिकेट क्लब पिंगळसई ब व भैरवीनाथ धामणसई या संघांनी प्राप्त केले आहेत. या स्पर्धेत महेश बारस्कर उत्कृष्ट गोलंदाज ठरले. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून विवेक मुटके, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान सौरभ ठाकूर व मालिकावीर म्हणून विवेक जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मारुती कदम, खेळू ढमाळ, शिवाजी मुटके, धर्मा शेलार, यशवंत मोंडे, तानाजी मोरे, सुशील खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी माजी आमदार अनिकेत तटकरे, जि. प. उपाध्यक्ष मधुकर पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद पाशिलकर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, माजी उपसभापती अनिल भगत, शंकर म्हसकर, शिवराम महाबळे, शिवराम शिंदे, विष्णू लोखंडे, महादेव साळवी, अनंत थिटे, मुकेश भोकटे, निवास खरिवले, सुहास खरिवले, सतिश भगत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक यासिन मर्चन्ट व संजय म्हात्रे यांनी केले.
फोटो कॅप्शन : प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पिंगळसई संघाला सन्मानित करताना मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.