मुंबई

पादुका दर्शन महोत्सवात संतपरंपरेचा जागर

CD

पादुका दर्शन महोत्सवात संतपरंपरेचा जागर
डोंबिवली-कल्याण ग्रामीण भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : संतपरंपरेचा गौरव आणि आध्यात्मिक विचारांची जागृती करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘पादुका दर्शन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. २१) आणि रविवारी (ता. २२) मुंबईतील एनएससीआय डोम येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे.

‘भारत ही संतांची भूमी आहे’ या विचारातून प्रेरित होत, समाजाला दिशा देणाऱ्या संतांच्या कार्याचा जागर या महोत्सवातून केला जाणार आहे. संतांनी दिलेली समता, माणुसकी आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकच महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची आणि त्यांच्या विचारांशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवासाठी डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, विविध हरिपाठ मंडळे व संस्थांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये नागेश्वर नवनाथ ध्यानमंदिरचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष अर्जुन केणे, श्री सिद्धी गणेश मंदिर हरिपाठ मंडळ कोळेगावचे ह.भ.प. प्रेमनाथ पाटील व मंदा पाटील, संत सावळाराम बाबा हरिपाठ मंडळ (आयरे गाव) यांच्या रोहिणी पाटील, भगवान जगन्नाथ गोपाल कृष्ण ट्रस्टचे गुरुनाथ म्हात्रे, विठ्ठल मंदिरचे ह.भ.प. बालकृष्ण महाराज तसेच ह.भ.प. अजय महाराज (मांगलूर) यांचा सहभाग असणार आहे.

महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, परंपरेचे जतन आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा उत्सव ठरणार आहे. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT