मुंबई

देशाच्या समृद्धीसाठी डोंबिवलीकरांची सामूहिक प्रार्थना

CD

देशाच्या समृद्धीसाठी डोंबिवलीकरांची साकडे
विविध मंदिरांत सामूहिक प्रार्थना
डोंबिवली, ता. १८ : हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त डोंबिवलीत ''देशाची समृद्धी आणि सामाजिक एकात्मता'' या उद्देशाने सामूहिक प्रार्थनेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. गणेश मंदिर संस्थान आणि हिंदू नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी एकत्र येत उपासना केली.

सनातन संस्कृतीचे जतन आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची जाणीव दृढ व्हावी, या हेतूने सोमवारी शहरातील विविध देवळांमध्ये स्थानिक रहिवासी एकवटले होते. या वेळी अथर्वशीर्ष पठण, रामरक्षा स्तोत्र, रामनाम जप आणि उपास्य देवतांची मनोभावे पूजा करण्यात आली. या उपक्रमात वयोवृद्ध महिलांसह गृहिणींचा उत्स्फूर्त आणि लक्षवेधी सहभाग पाहायला मिळाला. या उपक्रमासाठी रूपाली शाईवाले, अनघा बोंद्रे, प्रकाश नायक, अमित सराफ, आकाश गायकवाड, शामल जोशी आणि नेत्रा फडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सुख-समृद्धी लाभो!
उपासनेनंतर डोंबिवलीसह संपूर्ण देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. हा उपक्रम गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त गौरी कुंटे आणि बाळकृष्ण सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला. प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून किमान एकदा सहपरिवार मंदिरात जाऊन प्रार्थना करावी. मंदिरे केवळ दर्शनाचे ठिकाण न राहता ती सामाजिक परिवर्तनाची केंद्रे बनावीत, हीच आमची भावना आहे, असे आयोजक समितीन म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Jalgaon Water Crisis : जळगावकरांवर जलसंकटाची टांगती तलवार! १४ कोटींच्या थकबाकीमुळे २७ मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

SCROLL FOR NEXT