मुंबई

मुरबाड शहरातील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू

CD

मुरबाडकरांचा प्रवास सुसाट
शहरातील पहिल्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या पहिल्या उड्डाणपुलावरून अखेर वाहतूक सुरू झाली आहे. स्टेट बँक ते अंजनी गॅस एजन्सी यादरम्यानचा हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

मुरबाड शहरातील स्टेट बँक परिसर ते अंजनी गॅस एजन्सीपर्यंत हा पूल विस्तारलेला आहे. माळशेज घाटाकडे जाणारी वाहने आता थेट या पुलावरून प्रवास करत आहेत. अधिकृत उद्घाटनापूर्वीच प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. उड्डाणपुलावरून मुरबाड शहर आणि परिसराचे नयनरम्य दृश्य दिसत असल्याने, अनेक दुचाकीस्वार या पुलावर फेरफटका मारताना दिसत आहेत.

मुरबाड एसटी बस स्थानकाच्या पुढे उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूला अंतर्गत रस्ता करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे मंगळवारपासून उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. कल्याण-मुरबाड-माळशेज घाट या मार्गावरील ''पाचवा मैल'' ते मुरबाड या २३ किलोमीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि चौपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे महत्त्वाकांक्षी काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Jalgaon Water Crisis : जळगावकरांवर जलसंकटाची टांगती तलवार! १४ कोटींच्या थकबाकीमुळे २७ मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

SCROLL FOR NEXT