मालवणीतील वृक्षतोडीवरून दादागिरी; कोयता दाखवून धमकी
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी म्हाडा गेट क्रमांक ८ परिसरातील ब्रह्मा इमारतीच्या मागील भागात वृक्षतोडीच्या वादातून दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तीने सोसायटीचे सचिव इर्शाद खान यांनी वृक्ष तोडीस विरोध केल्यावर काही व्यक्तींनी कोयता दाखवून धमकी दिल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मा इमारतीच्या मागील बाजूस काही व्यक्ती वृक्ष तोडत असताना सोसायटीचे सचिव इर्शाद खान यांनी या प्रकारास विरोध केला. यावर त्या टोळक्यातील एका व्यक्तीने थेट कोयता दाखवत खान यांना धमकी दिली. काही वेळानंतर ती व्यक्ती थेट इमारतीच्या परिसरात शिरली व त्याने इतर रहिवाशांनाही धमकावल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी या प्रकरणात तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत खान म्हणाले की, मी या घटनेची माहिती मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिली व त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले आहे. आम्हाल धमकावल्याचा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, वृक्षतोडीबाबतची माहिती मी वन विभागाला दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.