मुंबई

जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बसथांबा अडचणीत

CD

रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांचे हाल
बससेवाही तात्पुरती बंद

जोगेश्‍वरी, ता. १९ : जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदय नगर मार्गावर असलेला बस थांबा रस्त्याच्या कामामुळे पूर्णपणे वेढला गेला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्ताच्या कामामुळे बस थांब्याच्या पूर्ण परिसराभोवती हिरव्या कपड्याचे कुंपण घालण्यात आले आहे. सोबतच आजूबाजूला बॅरिकेड्सही उभारण्यात आलेत. या मार्गावरील बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून, स्थानक किंवा इतर ठिकाणी प्रवास करताना नागरिकांना इतर पर्यायी सेवेचा अवलंब करावा लागत आहे. तसेच या बस थांब्याच्या अवती भोवती असलेल्या परिसरात अनधिकृत फेरीवालांच्या गाड्या व इतर साहित्य ठेवले असल्याने नागरिकांना येथील पदपथही वापरता येत नाही आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी येथून प्रवास करणे कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करता के-पूर्व भागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच बेस्ट बस प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात अवकाळीचा कहर

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT