महिला नेतृत्व आणि व्यावसायिक प्रगतीचा जागर; आयसीएसआय डोंबिवली विभागाचा प्रेरणादायी परिसंवाद
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : भारतीय कंपनी सचिव संस्था डोंबिवली विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला परिसंवाद ज्ञान आणि प्रेरणेचा संगम ठरला. महिला नेतृत्व, सशक्तीकरण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी या विषयांवर आधारित या उपक्रमाने उपस्थित व्यावसायिक महिलांना नवी दिशा दिली.
डोंबिवलीतील शुभम बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले विचार मांडले. महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थवील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या वाढत्या सहभागावर आणि नेतृत्वावर प्रकाश टाकला. आरओसी मुंबई-२ निबंधक अनन्या सैकिया यांनी कॉर्पोरेट नियमांमधील बदल आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रादेशिक परिषद सदस्य अमृता डी. सी. नौटियाल यांनी स्वतंत्र संचालक पदावरील संधी आणि नेतृत्व विकासाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोळसेवाडी पोलिस उपनिरीक्षक यांनी संजीवनी तोडकर यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला.
व्यावसायिक महत्त्व
परिसंवादाला ११६ कंपनी सचिवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे, सहभागी सदस्यांना चार संरचित सतत व्यावसायिक शिक्षण गुण प्रदान करण्यात आले, ज्यामुळे या कार्यक्रमाचे व्यावसायिक मूल्य अधिक वाढले.
यशस्वी आयोजन
हा उपक्रम आयसीएसआय डोंबिवली विभागाचे अध्यक्ष सतीश भानुशाली आणि सचिव रुशभ दोशी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाला. या वेळी सेंट्रल कौन्सिल सदस्य प्रवीण सोनी आणि वेस्टर्न रिजनचे चेअरमन योगेश चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मित्तल, रुपाली रेखी, कुशला रावत, विजय सोनोने आणि नितेश म्हात्रे या समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.