पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : जेसीबीचालकाच्या निष्काळजीमुळे एका सुपरवायझरला आपल्या प्राणाला मुकावे लागल्याची घटना पनवेलमधील सुकापूर येथे घडली आहे. अमोल अर्जुन राठोड (वय ३६) याच्या मृत्यूप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी जेसीबीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. जेसीबीचालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमोल राठोड (रा. उलवे) हा ओमकार कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. १२ मार्चला सकाळी सुकापूर येथील बालाजी सिम्फनीजवळ नाल्याचे काम सुरू असताना अमोल हा सुपरवायझर म्हणून देखरेख करत होता. आशिक रेजा (वय २३) हा जेसीबी चालवत होता. काम सुरू असताना चालकाने बेदरकारपणे जेसीबी चालवून समोरचा जेसीबीचा फावडा (बकेट) थेट अमोलच्या कमरेत आणि उजव्या मांडीत घुसवला. या अपघातात अमोल हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.