मुंबई

गौणखनिज वाहतुकीला लगाम

CD

गौणखनिज वाहतुकीला लगाम
खडकोली गावातील रस्ता वनविभागाकडून बंद

मनोर, ता. १९ ः पालघर तालुक्यातील खडकोली गावाच्या हद्दीतील वनजमिनीतील रस्त्याचा वापर क्रशर उद्योगातील वाहनांच्या रहदारीसाठी केला जात होता. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर वनविभागाकडून हा रस्ता व्यावसायिक वाहनांच्या वापरासाठी बंद करण्यात आला आहे.
खडकोली गावाच्या हद्दीतील गट क्रमांक १८५,१७७ / अ,१७७ / ब,१८७ आणि १८ ९ येथील दगड खाण, क्रशर मशीनने होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतीवर परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तत्कालीन आमदार राजेश पाटील, आदिवासी नेते काळूराम धोदडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून हा रस्ता बंद करण्यात आला होता. याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. तसेच ग्रामपंचायतीने दिलेल्या ना-हरकत दाखल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. या उत्खननामुळे दगड खाणीलगतचे नैसर्गिक नाले कोरडे पडल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच शेतीसह पर्यावरणाचे नुकसान होत असल्यामुळे क्रशर मशीन सुरू करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता.
---------------------------
ग्रामस्थांची गैरसोय
खडकोली ग्रामस्थांच्या दैनंदिन शेतीपूरक वापरासाठी वनविभागाच्या जागेतून तयार केलेल्या रस्त्याचा वापर क्रशर मशीनमधील खडीची वाहतूक करणारे ट्रक करत असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबतची तक्रार आल्यानंतर वनविभागाकडून रस्त्यावर चर खोदण्यात आले आहेत. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.
---------------------------------
खडकोली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रहदारीसाठी रस्ता खुला करण्यात आला होता. रस्त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या तक्रारीनुसार चर खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
- रिटा वैद्य, वनपरीक्षेत्र अधिकारी, सफाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : अश्लील संदेश पाठवायचा; पवईत तरुणीने परप्रांतीयाला दिला चांगलाच चोप

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT