मुंबई

भीक मागणाऱ्या हातात आता येणार पुस्तक

CD

भीक मागणाऱ्या हातात आता येणार पुस्तक
रेल्वे स्थानकावरील हरवलेल्या बालपणाला मिळणार शिक्षणाची नवी वाट; मध्य रेल्वेचा संवेदनशील पुढाकार
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील गजबजलेल्या रेल्वे स्थानकांवर दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते. या गर्दीत काही असेही चेहरे दिसतात, ज्यांच्या डोळ्यांत शाळेची स्वप्ने नसून केवळ जगण्यासाठीची धडपड दिसते. भटकंती, भीक मागणे किंवा रेल्वे मार्गावर धावत्या गाड्यांवर दगडफेक करण्यासारख्या चुकीच्या वातावरणात अडकलेल्या या बालकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन संवेदनशीलता जपली आहे.
या उपक्रमांतर्गत अशा मुलांची ओळख पटवून त्यांना प्राथमिक शिक्षण, समुपदेशन तसेच कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. रेल्वे पोलिस आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने या मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून अशा बालकांसाठी कार्य करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेला मध्य रेल्वेकडून नवी मुंबईतील रेल्वे परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे मुलांना शिक्षणासोबतच माया, आधार आणि नव्याने आयुष्य घडवण्याची संधी मिळणार आहे. परिस्थितीमुळे चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या या मुलांना वेळेवर आधार मिळाला तर त्यांचे आयुष्य बदलू शकते, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

उपक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात
या उपक्रमाची रूपरेषा आरपीएफ पोलिसांकडून तयार करण्यात आली आहे. तसेच काही समाजसेवी संस्थांसोबत बैठकादेखील पार पडल्या आहेत. लवकरच या उपक्रमाची सविस्तर माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात येणार असून, त्यानंतर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या आरपीएफ सूत्रांनी दिली.

मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
शिक्षणासोबतच चांगल्या सवयी, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे धडे देऊन या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. गर्दीत हरवलेल्या या बालपणाला पुन्हा स्वप्ने पाहण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

दररोज सापडतात १० ते १५ मुले
मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या पाहणीत दररोज सरासरी १० ते १५ असुरक्षित मुले आढळून येतात, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये घरातून पळून आलेली मुले, हरवलेली मुले तसेच भीक मागणारी आणि प्लॅटफॉर्मवर भटकणारी मुले यांचा समावेश असतो. या मुलांची ओळख पटवून त्यांची माहिती नोंदवली जाते. त्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT