मुंबई

विकलेल्या भूखंडाची पुन्हा दुसऱ्याला विक्री

CD

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : भारतीय सैन्यातील ८१ वर्षीय निवृत्त कॅप्टनची एका बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या दोन मुलांनी मालमत्ता व्यवहारात २२ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. व्यावसायिकाने त्यांना २००६ मध्ये विकलेले दोन भूखंड परस्पर दुसऱ्या व्यक्तींना विकून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी आर. आर. कल्याणकर कन्स्ट्रक्शनचे मालक आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कॅप्टन संतोष परशुराम शर्मा हे सीबीडी बेलापूर येथे राहण्यास असून, २००६ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून तळोजा मजकूर, फेज-२ येथील द्वारका बंगलो स्कीममधील दोन भूखंड आर. आर. कल्याणकर कन्स्ट्रक्शनचे मालक रमेश कल्याणकर यांच्याकडून खरेदी केले होते. यासाठी शर्मा कुटुंबाने त्यांना एकूण २२ लाख ८० हजार रुपये अदा केले होते. तसेच या व्यवहाराची रीतसर नोंदणीही करण्यात आली होती. शर्मा यांनी दोन्ही भूखंडावर झाडे लावून बाग तयार केली होती, तसेच देखभालीसाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती. फेब्रुवारीमध्ये देखभालीसाठी गेलेल्या व्यक्तीला भूखंडावर पत्र्याचे शेड मारल्याचे, तसेच झाडे तोडल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता, हे भूखंड आता दुसऱ्याच्या नावावर असल्याचे समजले. शर्मा यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता, कल्याणकर यांनी हे भूखंड प्रितपाल सिंह आणि अब्दुल मुनाफ राखे यांना पुन्हा विकल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT