मुंबई

श्रीवर्धन येथील नागरिकांची रंबल स्ट्रिप ची मागणी.

CD

सुसाट वाहनांची श्रीवर्धनकरांना भीती
नागरिकांची रंबल स्ट्रिप पसवण्याची प्रशासनाकडे मागणी
श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर) ः कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पर्यटनासोबतच वाढलेली वाहनांची वर्दळ आणि त्यांच्या बेफाम वेगामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील सरळ रस्त्यांवर वेगाची मर्यादा ओलांडणारी वाहने अपघातांना निमंत्रण देत असल्याने, मुख्य चौकांमध्ये आणि संवेदनशील भागात रंबल स्ट्रिप (वेगरोधक पट्टे) बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पर्यटनवाढीला लागले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक तरुणांना पर्यटन व्यवसायातून रोजगार प्राप्त होत आहे, परंतु श्रीवर्धन शहरातील रस्ते हे सरळ आणि विनाअडथळे असल्याने पर्यटक चारचाकी, दुचाकी बेफाम वेगाने नेताना आढळतात. त्यातच अल्पवयीन मुलेही चार चाकी चालवताना सर्रास आढळतात. रस्त्याशेजारी मंदिरे, शाळा, रुग्णालये तसेच शहरात काही अंतरावर चौक असूनही पर्यटकांना वाहन चालवताना गांभीर्य नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा पर्यटकांना आपल्या ताब्यातील वाहनावर नियंत्रण न ठेवता आल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांकडून तालुक्यात काही दुर्घटना घडल्यास प्रशासनाकडून तात्पुरती नाकाबंदी व चेक पोस्ट उभारले जातात, परंतु पर्यटकांच्या वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांच्या वाहनांची भीती आता नागरिकांच्या मनात निर्माण झाली असून, रंबल स्ट्रिप बसवण्याची मागणी होत आहे.

या ठिकाणी हव्यात ठोस उपाययोजना
नागरिकांनी शहरातील प्रमुख नाके, शाळा परिसर, मंदिरे आणि रुग्णालयांच्या लगत रंबल स्ट्रिप बसवण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. रंबल स्ट्रिपमुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होईल आणि संभाव्य मोठे अपघात टाळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी साठी सर्वसाधारण सभेत विषय घेण्यात येईल. रंबल स्ट्रिपबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
- विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT