मुंबई

घरोघरी मातीच्या चुली. तुपगावातील चुलीला मागणी वाढली

CD

पुन्हा पेटल्या घरोघरी मातीच्या चुली
गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे तुपगावातील चुलींना मागणी वाढली
खालापूर, ता. १८ (बातमीदार) ः आधुनिक जीवनशैलीत घरातून हद्दपार झालेली मातीची चूल गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुन्हा आपलीशी वाटू लागली आहे. खालापुरातील चुली तयार करण्याचे केंद्र असलेल्या तुपगावात गृहिणींची वर्दळ वाढली असून, चूल खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
ऐन सणासुदीत युद्धामुळे निर्माण झालेली घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे गृहिणींची चिंता वाढली आहे. गॅस सिलिंडरसाठी ग्रामीण भागात सव्वा महिना प्रतीक्षा करावी लागणार असल्याने स्वयंपाकघरातील गणित बिघडले आहे. जेमतेम महिनाभर पुरणारा गॅस सिलिंडर आणखीन पंधरा दिवस कसा पुरवायचास या विवंचनेत असलेल्या गृहिणींनी पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. खालापूर तालुक्यातील तुपगाव हे मातीच्या वस्तूसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कुंभार समाजाची मोठी वस्ती असून, आपला पारंपरिक व्यवसाय काही कुटुंबांनी टिकवून ठेवला आहे. तुपगावात मिळणारी मातीची भांडी, पाण्याचे माठ आणि चुली यांना पंचक्रोशीत मोठी मागणी असते. सध्या मातीच्या चुलीला मागणी वाढली असून, अवघ्या आठ दिवसांत शंभर चुलींची विक्री झाल्याचे चंद्रकांत कुंभार यांनी सांगितले. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त विक्री होणाऱ्या मातीच्या माठापेक्षा सध्या चुलींना चांगली मागणी आहे.

पापड, कुरडईच्या हंगामात चुलीचा आधार
नेहमीपेक्षा मार्च, एप्रिल, मे या कालावधीत गॅसचा गृहिणींकडून जास्त प्रमाणात वापर होतो. मुलांच्या शाळेला लागलेल्या सुट्ट्या, पाहुण्यांची वर्दळ आणि गृहिणींचे पापड, कुरडई, शेवया यासारखे जिन्नस बनवण्याचा हा कालावधी असल्याने गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आता हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी चुलीचा आधार घ्यावा लागणार आहे.

चूल दोन प्रकारे बनवली जाते. यामध्ये छोटी आणि दुसरी चूल आकाराने मोठी असते. काही वर्षांपासून महाग झालेला तूस तसेच मातीचेदेखील वाढलेले भाव यामुळे चुलीचे दरदेखील वाढले आहेत. आठ दिवसात शंभरपेक्षा अधिक चुलींची विक्री झाली असून, दररोज चूल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
- माधुरी कुंभार, विक्रेत्या, तुपगाव

**फोटो : तुपगाव येथे चूल खरेदीसाठी आलेल्या गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT