मुंबई

पैठणी-खादीच्या नाजूक संगमातून साकारते संस्कृती

CD

पैठणी-खादीच्या नाजूक संगमातून साकारते संस्कृती
बदलापुरातील शिरसाट कुटुंबाची परंपरेला आधुनिक कलात्मक ओळख
मोहिनी जाधव; सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १८ : गुढीपाडव्याचा उत्साह आता केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षभर घरात टिकून राहणार आहे. बदलापूर (पूर्व) येथील शिरसाट कुटुंबाने पारंपरिक गुढीला आधुनिक आणि कलात्मक रूप दिले असून, त्यांनी साकारलेल्या छोट्या, नाजूक गुढ्या आणि मराठमोळ्या टोप्यांची सध्या बाजारात मोठी धूम आहे.

कात्रप परिसरातील शिरसाट कुटुंबाने अतिशय कल्पकतेने या ‘शो-पीस’ गुढ्या तयार केल्या आहेत. या गुढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तांब्याचा छोटा कलश, लाकडी पाट, मोत्यांच्या माळा आणि विशेषतः पैठणी, खादी व इरकल कापडाचा वापर केला आहे. या गुढ्या इतक्या सुबक आहेत की त्या सण संपल्यावरही घराच्या शो-केसमध्ये कायमस्वरूपी सजावट म्हणून ठेवता येतात. अवघ्या २०० रुपयांत आकर्षक गुढी आणि २५० रुपयांत पारंपरिक मराठमोळी टोपी उपलब्ध आहे. मराठी संस्कृती जपण्याचा आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. टाकाऊतून टिकाऊ आणि कलात्मक वस्तू बनवताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी प्रतिक्रिया शिरसाट कुटुंबाने दिली.

बदलापूर पश्चिम येथील प्रगती अंध विद्यालयातील कार्यानुभव शिक्षक रवींद्र शिरसाट आणि त्यांच्या पत्नी मनीषा शिरसाट हे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कलेला मुलेही साथ देत असून, घरच्या घरी सुरू केलेल्या या छोट्या उद्योगाला आता मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध प्रदर्शनांमध्ये त्यांच्या या ‘लोकल’ हस्तकलेला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोकप्रतिनिधींचे पाठबळ
शिरसाट कुटुंबीयांच्या या जिद्दीला आणि कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरील मोक्याची जागा या कुटुंबाला स्टॉल लावण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे या कलेला प्रसिद्धी मिळण्यासोबतच कुटुंबाला आर्थिक पाठबळही लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT