साम फाउंडेशन, नवी मुंबई आणि हिंदू नववर्ष स्वागतयात्रा
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : हिंदू मराठी नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी नवी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. साम फाउंडेशन, नवी मुंबई आणि हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, वाशी यांच्या वतीने येत्या गुढीपाडव्यानिमित्त गुरुवारी (ता. १९) ‘नवी मुंबईचा पाडवा’ ही स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे.
विविधतेत एकता ही यावर्षीच्या स्वागतयात्रेची मुख्य संकल्पना असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील संस्कृतींचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. या सोहळ्यात नवी मुंबईतील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आपली संस्कृती, आपला अभिमान हा विचार जपत नवी मुंबईतील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन साम फाउंडेशन अध्यक्ष सागर मटकर आणि आयोजन समितीने केले आहे.
चौकट
सोहळ्याची प्रमुख आकर्षणे
- चित्ररथ आणि लोककला : महाराष्ट्रातील पारंपरिक लेझीम, ढोल-ताशा पथकांसोबतच इतर राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, लोकनृत्य आणि चित्ररथ.
- वारी जेजुरीची : यावर्षीच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे ‘वारी जेजुरीची’ हा सांस्कृतिक देखावा.
- रांगोळी प्रदर्शन : आंतरराष्ट्रीय रांगोळीकार श्रीहरी पवळे आणि त्यांचे सहकारी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या साकारणार असून, शिवाजी चौक येथे भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित केले आहे.
- विविध स्पर्धा : पैठणीची वारी (पैठणी स्पर्धा), रांगोळी स्पर्धा आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.