मुंबई

आकाश विश्व दर्शन उपक्रमाचे आयोजन

CD

आकाशविश्व दर्शन उपक्रमाचे आयोजन

मुंबई, ता. १८ : पराग प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेतर्फे २५ ते २६ एप्रिलदरम्यान सगुणा बाग, नेरळ येथे आकाशविश्व दर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच असेल.
या उपक्रमाअंतर्गत २५ एप्रिलला सायंकाळी ग्रहताऱ्यांचे विविध प्रकारच्या दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात येणार असून, यासाठी खगोल अभ्यासक, तज्ज्ञ डॉ. आनंद घैसास यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी करून दुर्बिणीतून आकाशविश्वाची व्याप्ती व दर्शन घडविणारे अभ्यासक अनुराग शेवडे हेदेखील खोगल अभ्यासकांना विविध विषयांची माहिती देतील. दुसऱ्या दिवशी २५ एप्रिलला सकाळी सगुणाबाग निर्मितीचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी २० ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पराग प्रतिष्ठान आणि खगोल मंडळातर्फे आकाशविश्व दर्शनाला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्या अनुषंगाने यंदाही या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभेल, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमासाठी इच्छुक सदस्यसंख्या मर्यादति असल्याने लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. प्रा. नागेश सावंत, सुनील सावंत आणि ॲड. वैदेही ओळतीकर यांच्याशी संपर्क साधत ऑनलाइन व प्रत्यक्ष स्वरूपात नोंदणी केली जाईल, असेही आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT