भिवंडीकरांना ‘पाणीबाणी’चा फटका
शहराचा पाणीपुरवठा सोमवारी २४ तास बंद
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या ‘स्टेम’ प्राधिकरणाकडून पावसाळ्यापूर्वीची तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे येत्या सोमवारी शहराचा पाणीपुरवठा सलग २४ तास बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. सोमवारी (ता. २३) सकाळी ९ ते मंगळवारी (ता. २४) सकाळी ९ या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर त्यानंतरचा एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भिवंडी शहरासाठी स्टेम मार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटनावर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
पाणीपुरवठा खंडित होणारे मुख्य भाग
टाकी विभाग : आय.जी.एम. पाण्याची टाकी, ममता हॉस्पिटल टाकी परिसर.
मुख्य वस्त्या : कणेरी, न्यू कणेरी, गौरीपाडा, पद्मानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, इस्लामपुरा, मिल्लतनगर (१, २, ३), शास्त्रीनगर, नेहरूनगर, म्हाडा कॉलनी, अवचितपाडा.
इतर परिसर : कामतघर, अंजूरफाटा, देवजीनगर, नारपोली, विठ्ठलनगर, निजामपुरा, आमपाडा, चव्हाण कॉलनी, वेताळपाडा, खंडूपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मणआळी, कासारआळी, भावेनगर, कोंबडपाडा, अजय नगर, गोकुळनगर, कल्याण रोड, तीनबत्ती, शिवाजी नगर.
कंपाउंड आणि ग्रामीण भाग : चाविंद्रा गाव, पटेल नगर, बाला कंपाउंड, फरीदबाग, बारक्या कंपाउंड, नझराना कंपाउंड, टावरे कंपाउंड, भंडारी कंपाउंड, जुनी ताडाली, नदी ताडाली, लाहोटी कंपाउंड आणि भादवड परिसर.
प्रशासनाचे आवाहन
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटनावर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी रविवारीच आवश्यक साठवणूक करून घ्यावी, जेणेकरून सोमवारी होणाऱ्या गैरसोयीपासून वाचता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.