डॉ. मिता गंगावणे यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील रहिवासी डॉ. मिता संजय गंगावणे यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर झाला असून, त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला.
मंगळवार (ता. १७) चर्चगेट येथील एसएनडीटी वूमन युनिव्हर्सिटीच्या पाटकर दीक्षान्त सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठीचा हा पुरस्कार डॉ. गंगावणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्त्री-शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. मिता गंगावणे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उज्ज्वला चक्रदेव (कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रातील सहा महसुली विभागांमधून निवड करण्यात आलेल्या एकूण ११ महिलांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.