मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
कंटेनर कारवर उलटल्याने दुर्घटना; पाच जखमी
खालापूर, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. वेगाने येणारा कंटेनर कारवर उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९च्या सुमारास खोपोली बाह्यमार्गावर मुंबई लेनमध्ये हा अपघात झाला. सिमेंट बल्कर ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. याच वेळी मागून वेगाने येणाऱ्या कंटेनरचालकाला परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्याने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन पुढील कारवर पलटी झाला. या अपघातात पुण्यातील अंबादास पेटारे, श्रीकांत जाधव आणि प्रमोद पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर भानुदास गायकवाड, अक्षय गायकवाड, नवनाथ आणि स्वप्नील हे जखमी झाले. कंटेनरचालक भानुदास यादव यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत पथक, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस तसेच इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी चालकाला लोकमान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.