मुंबई

महासभा ६ वाजेपर्यंत संपवा ; चैत्र नवरात्रोत्सव मिरवणूक

CD

महासभा ६ वाजेपर्यंत संपवा
चैत्र नवरात्रोत्सव मिरवणुकीसाठी महापौरांच्या सूचना ः सभागृहात चर्चांना उधाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापलिकेची बुधवारी (ता. १८) सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील प्रश्नांवर चर्चा करण्याबरोबरच प्रभागातील प्रश्न मांडण्यावर नगरसेवकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. या वेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी थेट कोपरीत चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू होणार असून, त्याच्या मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजता जायचे असल्याने विषयपत्रिकेवरील विषय लवकर संपविण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या निर्देशाने सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महासभा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक सुहास देसाई यांनी प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. चार वर्षे प्रशासकीय राजवटीमुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे त्यांनी नमूद करीत गंभीर विषयांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर उत्तर देताना शर्मिला पिंपोळलकर यांनी कामकाज लवकर आटोपण्याचे निर्देश दिले. सायंकाळी कोपरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चैत्र नवरात्रोत्सवातील देवीच्या आगमन मिरवणुकीमुळे विषयपत्रिका सहा वाजेपर्यंत संपवण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे इतर विषयांवर चर्चा टाळण्याची सूचना करण्यात आली. या भूमिकेमुळे सभागृहात नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. एकीकडे कामकाज लवकर आटोपण्याच्या सूचनेवरून निर्माण झालेला वाद आणि दुसरीकडे चिन्हांवरून रंगलेली राजकीय चढाओढ यामुळे महासभा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली.

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद शाळेतून तीन सिलिंडर चोरीला, हिंगोलीमधील धक्कादायक प्रकार

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

SCROLL FOR NEXT