जीवदानी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात
वसई ता. १८ (बातमीदार) : विरार पूर्व येथील श्री जीवदानी देवी संस्थान येथे चैत्र नवरात्रोत्सवाला आज गुरुवार (ता. १९) पासून सुरुवात होत आहे. गुढीपाडव्यापासून श्री रामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री जीवदानी मातेला महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर वस्त्रालंकार, शृंगार, नैवेद्य आणि धूपारती होईल. सकाळी पावणेआठ वाजता गुढी उभारल्यानंतर गणेशपूजन, संवत्सर पूजन आणि पंचांग पूजनाचे विधी पार पडतील. दरम्यान, १९ ते २६ मार्चदरम्यान दररोज श्री चंडीपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान २३ मार्चला गडावर असलेल्या श्री महाकाली देवीसमोर लक्ष्मी पंचमीनिमित्त हवन केले जाणार आहे. तसेच २६ मार्चला श्रीरामनवमी उत्सव साजरा करून या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. मंदिर परिसरात उत्सवी वातावरण असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.