मुंबई

मुरुड तालुक्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

CD

मुरूड तालुक्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांची माहिती
मुरूड, ता. १८ (बातमीदार) ः राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. हा संपूर्ण निधी मुरूड तालुक्यातील पर्यटनवृद्धीसाठीच्या रस्ते व्यवस्थापनाकरिता उपयोगात आणणार आहोत, अशी माहिती नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांनी दिली.
मुरूडचा पर्यटन विकास एकात्मिक पद्धतीने व्हावा, या उद्देशाने या निधीतून प्रमुख कामे केली जाणार आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रस्ते याविषयीच्या समस्या गांभीर्याने महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. मुरूड शहरातील भंडारी बोर्डिंग येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, मुरूड तालुका बांधकाम विभाग अध्यक्ष दिनेश मिणमिणे, मुरूड तालुका संघटक यशवंत पाटील, युवानेते दीपेश वरणकर, सरपंच शरद खेडेकर, ध्रुव लोदी, चिंता लोदी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निधीचे नियोजित वाटप आणि विकासकामे
१. राजपुरी-खोकरी रस्ता : खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी पाच कोटी ५० लाख रुपये
२. एकदरा पूल : गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी रुपये
३ मुरूड-शिघ्रे-गारंबी : रस्तादुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये
४ परेश हॉटेल ते आगरदांडा : हा रस्ता रुंदीकरणासह नव्याने बांधण्यासाठी सहा कोटी ५० लाख रुपये

तलावातील गाळ काढण्यासाठी निधीचा पाठपुरावा
आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण विभागासाठी मोठा निधी प्राप्त करून विकास करणार असल्याचे विघ्नेश माळी यांनी सांगितले. मुरूड तालुक्यातील चिंचघर, विहूर व उसडी हे पाझर तलाव जिल्हा परिषदेअंतर्गत येत असल्याने या पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT