कर्जाच्या ओझ्याने त्रस्त जोडप्याची आत्महत्या
पालघर, ता. १८ : बँकेच्या कर्जाचा वाढता बोजा सहन न झाल्याने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील उसरणी गावात घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. १७) रात्री उघडकीस आली.
कैलास किणी (४७) आणि त्यांची पत्नी कोमल किणी (३८) हे दोघे उसरणी गावात राहत होते. ते गावात किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. याशिवाय कैलास किणी यांचा ताडी विक्रीचा व्यवसायही होता. या व्यवसायासाठी त्यांनी बँक आणि इतर ठिकाणांहून कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचा वाढता ताण आणि आर्थिक अडचणींमुळे दोघेही मानसिक तणावात होते. या मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, कैलास यांचा भाऊ संदीप किणी घरी आला असता घर बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. संशय आल्याने त्याने केळवे सागरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता, दोघांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. याप्रकरणी केळवे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.