मुंबई

खून प्रकरणातील २१ वर्षांपासून फरार आरोपी अखेर अटकेत

CD

२१ वर्षांपासून फरार खून प्रकरणातील आरोपी अटकेत

अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील २००४ सालच्या खून प्रकरणात तब्बल २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पेण पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मनोज पांडव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २० मार्च २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात प्रसाद गणेश ठाकूर याच्या खुनाचा गुन्हा २ एप्रिल २००४ला नोंदवण्यात आला होता. फिर्यादी गणेश नागेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपूर्वी आरोपीची बकरी फिर्यादीच्या परिसरात मृत अवस्थेत आढळल्याने वाद निर्माण झाला होता. याच वादातून आरोपीने १ एप्रिलच्या मध्यरात्री ते २ एप्रिलच्या सकाळदरम्यान वडवली गावाजवळ ठाकूर यांना अडवून तीक्ष्ण हत्याराने वार करीत त्यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीविरुद्ध यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर मनोज पांडव हा दीर्घकाळ फरार होता. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला १६ मार्च २०२६ला पनवेल येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT