मुंबई

महापौर चषक स्पर्धांसाठी पाच कोटींची तरतूद

CD

महापौर चषक स्पर्धेसाठी
पाच कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : डिजिटल युगात मोबाईलमध्ये गुरफटलेली मुले मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा उत्तम संधी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या २०२६-२७च्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले.

महापौर चषक क्रीडा स्पर्धा २०२५-२६च्या आयोजनाबाबत महापौर रितू तावडे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात संयुक्त सभा आज घेतली. या वेळी उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, समाजवादी पक्षाच्या गटनेता अमरीन शहजाद अब्राहनी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरसेवक धर्मेश गिरी, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तिवर्धन किरतकुडवे आदींसह मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेची तयारी करण्याकरिता तीनऐवजी चार महिन्यांचा कालावधी देण्यात येईल तसेच शैक्षणिक संस्थांची मैदाने स्पर्धेसाठी देण्यात यावीत, या मागणीचाही सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही तावडे यांनी दिले.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT