मुंबई

मिठीच्या सफाईसाठी कंत्राटदार मिळेना

CD

‘मिठी’च्या सफाईसाठी कंत्राटदार मिळेना
स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्य आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मिठी नदीच्या सफाईसाठी १७ मार्चपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख होती; मात्र त्याला कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या मिठी नदीसह छोट्या-मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्यास मुंबई जलमय होण्याची भीती बुधवारी (ता. १८) स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केली.

मिठी नदीची साफसफाई अद्याप सुरू झाली नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी उपस्थित केला. या कामासाठी कंत्राटदार प्रतिसाद का देत नाही, मुंबईची तुंबई झाली तर जबाबदार कोण, असा सवाल या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. या वेळी शहरातील बहुतांश नाल्यांची सफाई सुरू न झाल्याकडे नगरसेवकांनी समितीचे लक्ष वेधले. यात अंधेरी सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याकडे लक्ष वेधत, पाणी तुंबण्यास कारणीभूत होणाऱ्या मोगरा नाल्याची सफाई झाली नसल्याचे शिवसेनेचे यशोधर फणसे निदर्शनास आणले. दरम्यान, या मुद्द्यांची गंभीर दखल घेत, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत मिठी नदीसह नालेसफाईचा अहवाल प्रशासनाने समितीत सादर करावा, असे निर्देश दिले.

नालेसफाई मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष
पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला असून घाटकोपर येथील ‘एन’ विभागातील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला बुधवारी (ता. १८) सुरुवात करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘एन’ विभागात एकूण १४ नाल्यांची स्वच्छता केली जाणार असून या नाल्यांची एकत्रित लांबी १५,८८५ मीटर आहे. सोमय्या नाला आणि लक्ष्मीबाग नाला यांसारख्या प्रमुख नाल्यांचा यामध्ये समावेश आहे. यंदा एकूण २२,५११ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होणे, ही महापालिकेची प्राथमिकता आहे. त्यामुळे गाळ काढण्याची सर्व कामे पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.
- रितू तावडे, महापौर


मिठी नदीची लांबी : १७.८४ किमी
एकूण पाणलोट क्षेत्र : ७,२९५ हेक्टर
महापालिकेच्या हद्दीतील मिठी नदीची लांबी : ११.८४ किमी
‘एमएमआरडीए’च्या हद्दीतील मिठी नदीची लांबी : ६ किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT