‘भारतमाता’चा पडदा लवकरच उघडणार
मुंबई, ता. १८ : मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर समजले जाणारे लालबाग-परळ विभागातील भारतमाता चित्रपटगृह लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, काही आवश्यक परवानग्यांची पूर्तता होणे बाकी आहे. या परवानग्या मिळताच या चित्रपटगृहाचा पडदा उघडणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
गिरणगावातील हे चित्रपटगृह म्हणजे मराठी चित्रपटांचे हक्काचे घर होते. या ठिकाणी अनेक मराठी चित्रपटांनी सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिली साजरी केली आहे. काही चित्रपटांचे प्रिमिअरही याच चित्रपटगृहात झाले आहेत. दादा कोंडके, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आदी मंडळींनी येथे हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केला. मात्र, कोरोना काळात हे चित्रपटगृह बंद झाले. त्यानंतर ते कधी सुरू होणार याची चित्रपट रसिक वाट पाहात होते. गेल्या वर्षी हे चित्रपटगृह सुरू होणार, अशी चर्चा सिनेसृष्टीत रंगली, परंतु नूतनीकरणाचे काम रखडले. मात्र, आता हे काम पूर्ण झाले आहे. काही आवश्यक परवानग्या घेणे बाकी आहे. त्या परवानग्या मिळताच लवकरच हे चित्रपटगृह सुरू होईल, अशी माहिती मिळते. यामध्ये आसनव्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा तसेच अत्याधुनिक ध्वनियंत्रणा आदी कामे पूर्ण झाली आहेत. खरे तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे चित्रपटगृह सुरू करण्याचा मानस होता. परंतु सरकार दरबारी काही परवानग्या घेणे बाकी आहे. येत्या दोन किंवा चार दिवसांमध्ये ते कामदेखील पूर्ण होईल आणि हे चित्रपटगृह पुन्हा सुरू होईल, अशी माहिती मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.