मुंबई

पालिकेच्या खोदकामामुळे जलवाहिन्यांचे नुकसान

CD

पालिकेच्या खोदकामामुळे जलवाहिन्यांचे नुकसान; पाणीगळतीचा धोका
मालाड, ता. १९ (बातमीदार) : मालवणीतील साने गुरुजी वसाहत गेट क्रमांक तीन आणि चार परिसरात पालिकेच्या खोदकामामुळे अनेक जलवाहिन्यांना छिद्र पडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्थानिकांनी कंत्राटदाराला माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
नागरिकांच्या मते, या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होण्याची शक्यता आहे. तसेच साने गुरुजी वसाहत गेट क्रमांक दोन ते चारदरम्यान गटाराच्या काँक्रीटीकरणामुळे रस्त्याची उंची सुमारे एक ते दीड फूट वाढली आहे. याउलट, ब्लॉक क्रमांक तीनमधील आतील रस्ता खाली गेल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या घरात आणि दारात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, गटाराच्या कामातही दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नियमानुसार चार फूट खोली असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अडीच ते तीन फूटच खोदकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यासंदर्भात कंत्राटदाराच्या सुपरवायझरकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ केली तसेच आपले नाव सांगण्यासही नकार दिला. परिसरातील समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात अवकाळीचा कहर

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT